Abdul Sattar : दुष्काळात कर्जवसुलीला स्थगिती द्या !

आ. सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; हप्ते थकल्याने कर्जदारांचा सिबिल खराब होण्याची भीती
Abdul Sattar Loan Recovery Demand
Abdul Sattar Loan Recovery Demandpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी दुष्काळी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सर्व बँकांच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठविले आहे.

दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले असून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने नागरिकांवरील आर्थिक व मानसिक ताण वाढत असल्याचे सत्तार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Abdul Sattar Loan Recovery Demand
Rohit Pathare Case : वैजापुरात अटकेतील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

दुष्काळाच्या संकटात शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या पाठीशी शासनाने उभे राहून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा. या मागणीवर राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे.

कर्जदारांच्या सिबिल स्कोअरचे संरक्षण करा !

दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत कर्जवसुलीला स्थगिती देण्यासोबतच या काळात कर्जाचे हप्ते थकल्यामुळे कोणत्याही कर्जदाराचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये, अशी मागणी सत्तार यांनी केली आहे. तसेच वसुलीच्या नावाखाली कर्जदारांना मानसिक त्रास देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Abdul Sattar Loan Recovery Demand
Jalna Crime : जालन्यात चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.