Latur News : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात लक्षवेधी महामोर्चा

लातुरात हजारोंचा जनसागर रस्त्यावर; अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा, जोरदार घोषणाबाजी
Latur News
Latur News : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात लक्षवेधी महामोर्चाfile photo
Published on
Updated on

Mass rally against the sub-categorization of Scheduled Castes

लातूर, पुढारी वृत्तसेवा: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.६) लातूर शहरात काढण्यात आलेल्या महामोर्चेस उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. हजारोंचा सहभाग असलेल्या या महामोर्चात सुमारे ५९ जातींच्या विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

Latur News
Parbhani Protest : उपवर्गीकरण रद्दसाठी महामोर्चा

आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप आणि अमन आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जूने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मार्गावरील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्चादरम्यान सहभागी आंदोलकांनी उपवर्गीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा", "संविधानाशी छेडछाड चालणार नाही", "आरक्षणाचे विभाजन मान्य नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनात सहभागी युवकांनी हातात उपवर्गीकरणाला विरोध करणारे फलक, बॅनर्स आणि संविधान बचावाचे संदेश असलेले फलक घेऊन शासनाविरोधात तीव्र भूमिका व्यक्त केली.

Latur News
Latur News : उपवर्गीकरणाविरोधात लातुरात ६ जुलैला महामोर्चा

महामोर्चात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोर्चादरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखण्यात आले असून, प्रशासनानेही आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चाच्या समारोपावेळी उपवर्गीकरणाचा प्रस्तावित निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी निवेदनही संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी मंच उभारण्यात आला होता त्यावर अनेकजणांनी आपली भूमिका मांडली. आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकराच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या भूमिकेवर सडतोड टीका केली. विद्यमान राज्यसरकारला एकमेकांत भांडणे लावायची आहेत. याचे रिमोड नागपुरात आहे. याचा कर्ताकरविता वेगळा आहे. दगड लागला म्हणून दगडाला मारू नका पण तो दगड कोण मारला त्याचा शोध घ्या असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news