Latur News : उपवर्गीकरणाविरोधात लातुरात ६ जुलैला महामोर्चा

५० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार; आयोजकांची माहिती
latur news
Latur News : उपवर्गीकरणाविरोधात लातुरात ६ जुलैला महामोर्चाfile photo
Published on
Updated on

Mass rally in Latur on July 6 against sub-categorization

लातूर, पुढारी वृतसेवा : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जातीतील सर्व ५९ जाती, आंबेडकरवादी पक्ष-संघटना आणि संविधानवादी नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ६ जुलै रोजी लातूर येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महामोर्चा समितीने पत्रकार परिषदेत दिली.

latur news
Beed Matang Community Protest : "आमच्या हक्काचं, आम्हाला द्या!"

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी सुरू होणारा हा महामोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालय (जिल्हा परिषद गेट) येथे धडकणार आहे. मोर्चात अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे प्रतिनिधी, आंबेडकरवादी संघटना, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी कोणत्याही सांगितले. आरक्षणात प्रकारचे उपवर्गीकरण होऊ नये,

अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व अबाधित राहावे, ही या महामोर्चाची प्रमुख भूमिका असल्याचे समितीने स्पष्ट केले. तसेच शासकीय सेवांमधील अनुसूचित जातींचा अनुशेष तातडीने भरावा, सर्व रिक्त आरक्षित पदे विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्यात यावीत, अशा प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत. या महामोर्चात रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह जिल्ह्यातील विविध आंबेडकरवादी पक्ष-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

latur news
Parbhani Protest : उपवर्गीकरण रद्दसाठी महामोर्चा

सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक या महामोर्चात सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण, लोकशाही आणि संविधानिक मार्गाने काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news