MGNREGA Scam Latur : मनरेगा योजनेतील विहीर, गोठ्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाने खळबळ; सरपंचांना बीडीओंची नोटीस

या प्रकरणावरून चाकूर पंचायत समितीचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे
Notice
NoticePudhari
Published on
Updated on

चाकूर : मनरेगा योजनेतील विहिरीसाठी २० हजार रुपये, तर गोठ्यासाठी ७ हजार रुपये पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात, असे वक्तव्य तालुक्यातील आटोळा ग्रामपंचायतीच्या आयोजित जाहीर ग्रामसभेत सरपंचांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे हे प्रकरण सरपंचांना भोवणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

Notice
MGNREGA Scam | धनगरवाडीत 'मनरेगा'चा महाघोटाळा: ८५ पैकी निम्म्या विहिरी फक्त कागदावरच; संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

दरम्यान, मनरेगा योजनेतील विहीर आणि गोठ्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा पुरावा असल्यास सादर करावा किंवा तीन दिवसांत खुलासा करावा, अशा आशयाची नोटीस बीडीओंनी २० ऑगस्ट रोजी सरपंचांना बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

Notice
Supreme Court Praises MGNREGA: 'मनरेगा' चांगली अन् प्रभावी योजना होती... सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक

आटोळा (ता. चाकूर) ग्रामपंचायतीची नुकतीच ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विकासकामांसह शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी पंचायत समितीअंतर्गत मनरेगाच्या विविध योजनांतील विहीर, गोठा आणि घरकुल यांसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या मंजुरीसाठी तसेच लाभासाठी पात्र लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्यात येतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

Notice
MGNREGA : बीड जिल्ह्यातील मनरेगाच्या २२५ कोटींच्या कामांची चौकशी

याच चर्चेदरम्यान ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरपंच महेश वत्ते यांनी ग्रामसभेत अनुदानित विहीर मिळविण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना तब्बल २० हजार रुपये, तर गोठ्यासाठी ७ हजार रुपये द्यावे लागतात, असे सांगितले. त्यानंतरच अधिकारी विहिरीचे बिल काढतात. त्यातील ५ हजार रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीपोटी भरून घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले.

Notice
MGNREGA Incomplete Works: मनरेगातील ४१ हजार कामे अपूर्ण; ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश

या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. सरपंच महेश वत्ते यांनी ग्रामसभेत चक्क ‘रेट कार्ड’च वाचून दाखवल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून, संबंधित आरोपांचे ठोस पुरावे सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणावरून चाकूर पंचायत समितीचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

Notice
Jalna MGNREGA Protest : जालन्यात ‌‘मनरेगा वाचवा, रोजगार वाचवा‌’ चा नारा

शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चक्क पैसे मोजावे लागतात, हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेऊन पंचायत समितीमधील भ्रष्ट साखळी मोडीत काढावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news