MGNREGA : बीड जिल्ह्यातील मनरेगाच्या २२५ कोटींच्या कामांची चौकशी

आष्टी मतदारसंघात रोहयो विभागाचे पथक दाखल; राम खाडे यांची माहिती
MGNREGA
MGNREGA : बीड जिल्ह्यातील मनरेगाच्या २२५ कोटींच्या कामांची चौकशीfile photo
Published on
Updated on

Inquiry into MGNREGA works worth ₹225 crore in Beed district

बीड, पुढारी वृत्तसेवा : आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 225 कोटी रुपयांच्या 1121 कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी रोहयो विभागाचे पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. सहआयुक्त (रोहयो) छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार उपआयुक्त (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती राम खाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

MGNREGA
Sambhajinagar News : आंतरधर्मीय जोडप्याला जबाब नोंदवण्यासाठी पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश

आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची मागणी नसताना तसेच आवश्यक कागदपत्रे व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट पुरावे नसताना काही कामांना प्रशासकीय आदेश काढून वर्क कोड देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही कामांचे अंदाजपत्रक एकाच पद्धतीने तयार करण्यात आल्याचे तसेच प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी मस्टर काढणे व बिले काढण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी 6 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन 1121 कामे रद्द करण्याची मागणी केली होती. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर चौकशी समितीने आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यांना भेट देऊन संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

MGNREGA
Sambhajinagar News : म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी घेतली सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट

सर्व कामांसाठी एकच अंदाजपत्रक

आष्ट मतदारसंघात 1 हजार 121 कामांचा समावेश एमआरजीएस अंतर्गत करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सर्व कामांसाठी एकच अंदाजपत्रक व एकच रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात प्रत्येक तलावाचे क्षेत्रफळ, स्थिती, आवश्यक दुरुस्तीची कामे, तांत्रिक बाबी व खर्च वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र तांत्रिक मान्यता, स्वतंत्र अंदाजपत्रक व आवश्यकतेनुसार वेगळी रक्कम मंजूर होणे आवश्यक होते. त्यामधील अनेक तलाव यापूर्वी वेगवेगळ्या योजनांमधून दुरुस्त झालेले आहेत, काही तलावच अस्तित्वात नाहीत, कोठेही लोकांची मागणी नाही, तरी देखील अशा प्रकारे कामे मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news