

Heavy rain Cloudburst in Latur district news
लातूर: जिल्ह्यात मुसळधार सुरूच असून चार तालुक्यासह 39 मंडळात अतिवृष्टी झाली असल्याने जिल्हा जलमय झाला आहे. शुक्रवारी (दि.२६) रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही अविश्रांत बरसतच असून, एका रात्रीत 75.3 मी मी पाऊस झाल्याने जिल्ह्यावर आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मांजरा ,रेना ,तावरजा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली असून नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत व पुराचे पाणी शेत, गावांत शिरल्याने तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांवरील पुलावर पाणी आल्याने गावांचे संपर्क तुटले आहेत. पुरात गुरे, शेती साहित्य वाहून गेले आहे. अनेक गुरांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून शुक्रवारी जिल्ह्यातील काही शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
अहमदपूर, उदगीर ,चाकूर ,जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अहमदपूर तालुक्यात एक्या रात्रीत १३७ मीमी पाऊस झाला आहे. या तालुक्यातील सहाही मंडळात अतिवृष्टी झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या खालोखाल उदगीर तालुक्यात 99.1 असा पाऊस एका रात्रीत नोंदला गेला असून याही तालुक्यातल सर्वच मंडळात अतिवृष्टीने कहर केला आहे. चाकूर तालुक्यात एका रात्री 94 . 8 मीमी पाऊस नोंदला असून या तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
जळकोट तालुक्यात 77.6 असा पाऊस नोंदला गेला असून, तेथील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नद्यांना पूर आले असून गाव अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रेनापुर तालुक्यात 62.6 मी पाऊस झाला असून येथील तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रेना नदीला पूर आला आहे नदीकाठच्या शेता गावांनी पाणी शिरले आहे. देवणी तालुक्यात 61.3 मी मी असा पाऊस झाला आहे तेथील एका मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शिरूर आनंतपाळ तालुक्यात 61.3 मी पाऊस झाला आहे दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
निलंगा तालुक्यात 53. 7 मेमी पाऊस झाला असून दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर तालुक्यात 59 मी मी पाऊस व चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे . औसा तालुक्यात २.८ मी पाऊस झाला असून या तालुक्यात दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान जिल्ह्याला आजही रेड अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे