Latur accident | सीट बेल्ट न लावणे चालकाच्या जीवावर बेतले; भीषण अपघातात दीड वर्षाच्या निष्पाप बाळासह दोघांचा मृत्यू

जढाळा गावाजवळील घटना; निष्काळजीपणामुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त
Latur accident
Latur accident
Published on
Updated on

किनगाव : वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियम पाळणे किती गरजेचे आहे, याचा एक अत्यंत भीषण आणि डोळे उघडवणारा प्रत्यय चाकुर तालुक्यातील जढाळा गावाजवळ आला आहे. एका कार अपघातात चालकाने सीट बेल्ट न वापरल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला, तर धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात एका दीड वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याचाही मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, चालकाच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.

Latur accident
Uran Accident News: उरणमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

पाठीमागून खोचलेला सीट बेल्ट ठरला काळ!

हा अपघात २५ मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला. एम.एच. १५ जे.एक्स. १५२८ या क्रमांकाची अर्टिगा गाडी धानोरा पाटीकडून बेलगावच्या दिशेने जात होती. जढाळा गावाजवळ आल्यावर चालक महादेव पांडुरंग नरहरे (वय २० वर्षे, रा. वरवंटी, ता. व जि. लातूर) याने कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोराची धडक दिली. पोलिसांनी दिलेली धक्कादायक माहिती:अपघातानंतर कारची एअरबॅग ओपन (खुल्या) झाली होती. परंतु, चालक महादेव याने सीट बेल्ट न वापरता तो पाठीमागून खोचून ठेवला होता. एअरबॅग उघडूनही सीट बेल्ट नसल्यामुळे चालकाचा जीव वाचू शकला नाही. यावरून वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे किती अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Latur accident
Washim Accident | नागपूर–संभाजीनगर महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार, एक जण गंभीर जखमी

हसते-खेळते कुटुंब अपघाताच्या खाईत, दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू

चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेले सहप्रवाशी विशाल व्यंकटराव मिरकले यांनी सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे ते या भीषण अपघातात केवळ किरकोळ जखमी झाले आणि त्यांचा जीव वाचला. मात्र, चालकाच्या निष्काळजीपणामुळे विशाल मिरकले, त्यांच्या पत्नी मेघा विशाल मिरकले हे गंभीर जखमी झाले. तर, त्यांचा अवघ्या दीड वर्षाचा लहान मुलगा इरेश विशाल मिरकले (रा. हटक्याळ, ता. कंधार, जि. नांदेड) याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. चालकाच्या हलगर्जीपणामुळे तो स्वतःच्या आणि निष्पाप बाळाच्या मरणास कारणीभूत ठरला. या प्रकरणी फिर्यादी विशाल व्यंकटराव मिरकले यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात ११ जून (वार गुरुवार) रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी सोनवणे करत आहेत.

Latur accident
Hingoli accident news | दुचाकीला पिकअपची जोरदार धडक, वरुड चक्रपाणमधील दोन शिक्षक जागीच ठार

किनगाव पोलीस, लातूर जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

किनगाव पोलीस स्टेशन व लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वाहनधारकांना वारंवार सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे आणि चारचाकी चालकांसह प्रवाशांनी सीट बेल्ट घालणे बंधनकारक आहे. नुकतेच किनगाव पोलिसांनी एक कौतुकास्पद रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये रक्तदान करणाऱ्या सर्व १७१ रक्तदात्यांना पोलीस प्रशासनाकडून हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पोलिसांकडून सीट बेल्ट संदर्भात सातत्याने जनजागृती केली जात आहे, तसेच नियम मोडणाऱ्या चालक व प्रवाशांवर कडक दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news