Hingoli accident news | दुचाकीला पिकअपची जोरदार धडक, वरुड चक्रपाणमधील दोन शिक्षक जागीच ठार

दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे
Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

सेनगाव : शहराजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. ही भीषण अपघाताची घटना शनिवारी (दि) रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण या गावातील रहिवासी असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Accident News
Bhandara Accident | तुमसर-रामटेक मार्गावर भीषण अपघात; काटेबाम्हनीचे उपसरपंच ठार

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूड चक्रपाण येथील शिक्षक संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे शनिवारी जनगणनाचे कर्तव्य पार पाडून रिसोड येथे पाहुण्यांकडे भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पाहुण्यांना भेटून ते दुचाकी वाहनाने परत सेनगावकडे निघाले होते. रात्री सुमारे आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन सेनगाव शहराजवळ आले असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.

Accident News
Accident News : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; दोन कामगार ठार

या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, रवीकिरण खंदारे, जमादार परमेश्वर क्षिरसागर, सुरुदुसे, यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गजानन व संतोष यांना तातडीने सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयातआणले. मात्र त्यांच्या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत असल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

Accident News
Washim Accident | नागपूर–संभाजीनगर महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार, एक जण गंभीर जखमी

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरूड चक्रपाण येथील गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. दोघांच्या मृतदेहावर सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे वरुड चक्रपाण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातानंतर पिकअप चालक पिकअप घटनास्थळी सोडून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news