Uran Accident News: उरणमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

दोन्ही चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने अत्यंत बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Raigad Road Accidents
Raigad Road Accidentsfile photo
Published on
Updated on

जेएनपीए, उरण: उरण ते मोरा रोडवरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर सोमवारी (१ जून) पहाटेच्या सुमारास दोन मोटारसायकलची अत्यंत भीषणा समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चालकांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन्ही चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने अत्यंत बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दि. १ जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडला. मोरा बाजूकडून उरणकडे येणारी मोटारसायकल आणि उरण बाजूकडून मोराकडे जाणारी मोटारसायकल यांच्यात हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर जोरदार धडक झाली.

Raigad Road Accidents
Vikramgad Water Scarcity: विक्रमगड तालुक्यात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी महिलांची रात्रंदिवस धडपड

धडक एवढी भीषण होती की, दोन्ही चालक रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाता झाल्यानंतर तात्काळ त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकांची नावे निखिल दिपक कुकडे (वय ३८ रा. शिवसागर अपार्टमेंट, नागाव रोड, उरण) आणि महेश प्रल्हाद चांदेकर (वय ३५, रा. बोरी मागिरदेव परिसर, डोंगरआळी, उरण) अशी आहेत. मृत निखिल हा बुलेट दुचाकी चालवत होता, तर महेश हा सीबी शाईन दुचाकी चालवत होता.

या प्रकरणी वैभव यशवंत कडू यांनी उरण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही मृत चालकांवर निष्काळजीपणाने वाहन चालवून एकमेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

Raigad Road Accidents
Rupali Kasat case: रुपाली कासट मृत्यू प्रकरण; आत्महत्या की हत्या?

उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पाऊस पडण्यापूर्वी काम पूर्ण करा - मागणी येत्या चार दिवसात पाऊस पडल्यानंतर या खोल चरांमध्ये आणि खड्ड्यांमध्ये पाणी साठणार आहे.

अशावेळी मुख्य रस्त्यावर वाहन चालकांना खोलीचा अंदाज येणार नाही त्यामुळे गाड्या घसरून गंभीर अपघात होऊ शकतात. पाऊस पडण्यापूर्वी वाहन चालकांची या त्रासातून सुटका करावी आणि रस्ता प्रभावी बनवून द्यावा अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news