Toll Plaza : किनगावात टोलनाका विरोधात नागरिकांचे आंदोलन

टोलमधून स्थानिकांना वगळा; टोलनाक्याची रुंदी वाढवा
किनगावात टोलनाका विरोधात नागरिकांचे आंदोलन
किनगावात टोलनाका विरोधात नागरिकांचे आंदोलनfile photo
Published on
Updated on

Citizens' Protest Against Toll Plaza in Kingaon

किनगाव : पुढारी वृत्तसेवा

अहमदपूर अंबेजोगाई रोडवरील अहमदपूर किनगाव येथील टोलनाका येथे बुधवारी गावकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले. येथील टोल नाक्यावर नुकतीच टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. आंदोलकांनी टोल नाक्यावर आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन येथील टोल नाका मॅनेजर यांना दिले.

किनगावात टोलनाका विरोधात नागरिकांचे आंदोलन
बिडकीनमध्ये टोल नाकाविरोधात संताप

अहमदपूर अंबेजोगाई रोडवरील किनगाव येथील टोल नाका हा गावात असल्यासारखा आहे. जिथे टोल नाका सुरू झाला आहे. त्याच्या आजूबाजूला नागरिकांची घरे आहेत तिथून गावात व शेतात जाण्यासाठी स्थानिकांनी टोल का द्यावा यावरून वाद होण्याचे प्रमाण वाढत आहेत.

निवेदनात रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण न होताच टोल वसुली का सुरू केली. किनगाव गावठाण हद्दीत टोलनाका असल्याने गावकऱ्यांचा विचार करावा व अशा अनेक मागण्या असलेले निवेदन आंदोलकांनी दिले.

किनगावात टोलनाका विरोधात नागरिकांचे आंदोलन
Nanded News | महावितरणचा मनमानी कारभार? थकबाकीच्या कारणावरून दावणगीर संपूर्ण गाव अंधारात

यावेळी टोल नाक्यावर सपोनी माणिक डोके हे आपल्या टीम सह बंदोबस्तात होते. गावकऱ्यांनी आंदोलन शांततेत पार करून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, किनगावचे प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके, जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे, भागवत गुट्टे, अशोक मुंडे, चंद्रप्रकाश हंगे यांच्यासह स्थानिक गावकरी, वाहनधारक व कार्यकर्ते उपस्थित होते.

किनगाव टोल प्लाझा येथे गावकऱ्यांनी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन केले. गावकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून निवेदनावर पुढील कारवाई होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात व एनएचएआय कार्यालयात निवेदन पाठवून देण्यात येत आहे.
- कमलेश बिसेन मॅनेजर किनगाव टोल प्लाझा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news