Nanded News | महावितरणचा मनमानी कारभार? थकबाकीच्या कारणावरून दावणगीर संपूर्ण गाव अंधारात

थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित; अधिकाऱ्यांचा अधिकाराचा अतिरेक की नियमांचा भंग?
Mahavitaran
महावितरण (File Photo)
Published on
Updated on

Hanegaon Davangir Power Outage

प्रसेनजीत दावनगीरकर
हणेगाव :
तालुक्यातील दावणगीर येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. थकबाकीच्या कारणावरून कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

करडखेड येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या या गावात “९० टक्के वीजबिल थकीत आहे” या कारणावरून अचानक वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गाव पूर्णपणे अंधारात होते. याशिवाय, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोणतीही सूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे.

Mahavitaran
Nanded news | किनवट बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर; सोयाबीनचे चुकारे थकल्याने गोदामाला ठोकले सील

या प्रकरणी ॲड. सद्दाम शेख दावणगीरकर यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन संबंधित शाखा अभियंत्यांच्या कारभाराची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी शाखा अभियंत्यांशी संपर्क साधला असता “कधी कधी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घ्यावे लागतात” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, विद्युत कायद्यानुसार संपूर्ण गावाचा वीजपुरवठा एकत्रितपणे खंडित करण्याची स्पष्ट तरतूद नसताना अशी कारवाई करण्यात आल्याने तिच्या वैधतेबाबत शंका निर्माण झाली आहे. गावातील वीज वितरण व्यवस्थाही धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर डीपी, वाकलेल्या तारा आणि खांबांवर वाढलेल्या वेली यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

Mahavitaran
Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगाराकडून पिस्टल, १८ जिवंत काडतुसे जप्त

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाई, उष्माघाताचा धोका, शेती व जनावरांचे नुकसान अशा समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असून अमानवीय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news