Autism : ऑटिझमग्रस्त मुलांमध्येही विशेष क्षमता; प्रेम, सन्मान अन् समान संधी द्या

दीपशिखा देशमुख यांची उमंग सेंटरला भेट; विद्यार्थ्यांशी संवाद, शिक्षक, पालकांच्या प्रयत्नांचे कौतुक
Autism
Autism : ऑटिझमग्रस्त मुलांमध्येही विशेष क्षमता; प्रेम, सन्मान अन् समान संधी द्याfile photo
Published on: 
Updated on: 

Autism children also have special abilities; Give love, respect and equal opportunity

लातूर, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष गुण आणि क्षमता असतात. ऑटिझम व विशेष गरजा असलेल्या मुलांकडे केवळ सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांना प्रेम, सन्मान आणि समान संधी दिल्या पाहिजेत. त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन 'रीड लातूर' उपक्रमाच्या संस्थापक दीपशिखा धिरज देशमुख यांनी केले.

Autism
Rohit Pawar Udgir Visit : बेघरांसोबत आमदार रोहित पवारांची दिवाळी; दुष्काळावरून सरकारवर निशाणा

दीपशिखायांनी उमंग सेंटरला भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ऑटिझम असलेल्या मुलांशी संवाद साधत त्यांच्या कलागुणांची आणि विविध कृर्तीची माहिती घेतली. मुलांचा निरागसपणा, जिद्द आणि त्यांच्यातील विशेष क्षमता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या, योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ही मुलेही स्वतःच्या क्षमता सिद्ध करू शकतात.

Autism
Anandacha Shida : दिवाळी गोड करण्यासाठी साकोळ परिसरात 'आनंदाचा शिधा' देण्याची मागणी

त्यांना समाजात आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालक घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. अशा संस्था मुलांना शिक्षणासोबत स्वावलंबनाचे धडे देत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात, असेही त्यांनी नमूद केले. विशेष गरजा असलेल्या मुलांना दयेची नव्हे, तर त्यांच्यातील क्षमता सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ, प्रोत्साहन आणि समान संधींची गरज आहे. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन दीपशिखा यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.