Anandacha Shida : दिवाळी गोड करण्यासाठी साकोळ परिसरात 'आनंदाचा शिधा' देण्याची मागणी

सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले
Anandacha Shida
Anandacha Shida : दिवाळी गोड करण्यासाठी साकोळ परिसरात 'आनंदाचा शिधा' देण्याची मागणीfile photo
Published on: 
Updated on: 

Latur News : Demand to give 'Happiness Ration' in Sakol area to sweeten Diwali

शिरुअनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : यंदा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे.

Anandacha Shida
Latur Sanitation Workers Protest : पगार नाही, बोनस नाही; घंटागाडी सफाई कामगारांची दिवाळी अंधारात !

अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने 'आनंदाचा शिधा' उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी साकोळ परिसरातील नागरिकांतून होत आहे.

दुष्काळामुळे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित झाले असताना किराणा साहित्य, खाद्यतेल आणि साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दिवाळी सण आनंदात साजरा करण्याची इच्छा असतानाही वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांना हात आखडता घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून 'आनंदाचा शिधा' मिळाल्यास गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. त्यामुळे गतवर्षी लाभ घेतलेल्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना यंदाही कोणत्याही अटीशिवाय तातडीने आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, असा सकारात्मक निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.