बीड : केजमध्ये जश्न ईद-ए-मिलाद दुन्नबी उत्साहात

ईद-ए-मिलाद
ईद-ए-मिलाद
Published on
Updated on

केज; पुढारी वृत्तसेवा : केजमध्ये जश्न ईद-ए-मिलाद दुन्नबी मोठया उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. ९ ऑक्टोबर) जश्न ईद-ए-मिलाद दुन्नबी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने केज शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रचंड मिरवणूक काढली. यात सर्व वृद्ध पारंपरिक पेहराव करून सहभागी झाले होते.

या मिरवणुकीमध्ये चौका-चौकात आणि रस्त्यावर फराळाचे मोफत स्टॉल लावून त्याद्वारे मसाला दूध, पाणी, फळे आणि खाद्य पदार्थ वाटप करण्यात आली. पत्रकार मुबशिरोद्दीन खतीब आणि शाहनवाज खतीब यांच्या स्टॉलवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीत सहभागी असलेल्यांना फराळ व पाणी वाटप करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news