Crime News : वडिलांशी का भांडता विचारल्याचा राग अनावर; काकाने लाकडी दांड्याने डोके फोडले

वडिलांशी सुरू असलेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याचा भयंकर राग धरून काका व काकूने मिळून २४ वर्षीय पुतण्यावर जीवघेणा हल्ला आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Uncle and aunt commit deadly attack on 24-year-old nephew

जालना, पुढारी वृत्तसेवाः वडिलांशी सुरू असलेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याचा भयंकर राग धरून काका व काकूने मिळून २४ वर्षीय पुतण्यावर जीवघेणा हल्ला आहे. ही संतापजनक घटना भोकरदन तालुक्यातील एकेफळ शिवारात घडली. काकूने हातातील खुरप्याने सपासप वार केले, तर काकाने लाकडी दांड्याने डोक्यात प्रहार करून डोके फोडले. या रक्तरंजित घटनेमुळे एकेफळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून हसनाबाद पोलीस ठाण्यात आरोपी काका व काकूंविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalna News : केंद्राचे अनुदान रखडले; ८ बायोगॅस लाभार्थी वंचित

फिर्यादी रवी बंडु लहाने (वय २३ वर्ष, व्यवसाय शेती, रा. एकेफळ, ता. भोकरदन) हे सोमवार, दि. १७ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या एकेफळ शिवारातील शेत गट क्रमांक १७७ मध्ये शेतात काम करत होते.

त्याच वेळी त्यांचे काका आत्माराम लक्ष्मण लहाने व काकू कविता आत्माराम लहाने हे रवी यांचे वडील बंडु लहाने यांच्याशी जोरात भांडण करत असल्याचे रवी यांच्या निदर्शनास आले. आपल्या वडिलांशी होत असलेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी रवी लहाने तिथे गेले आणि "तुम्ही माझ्या वडिलांसोबत का भांडण करता?" असे विचारले.

Crime News
Anwa crop damage: आन्वा परिसरातील जोमात आलेली पिके गेली कोमात; पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड : शेतकरी चिंताग्रस्त

याचा प्रचंड राग आल्याने काकू कविता लहाने यांनी कोणतीही दया न दाखवता हातातील खुरप्याने रवी यांच्या कानावर आणि डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पीडित रवी बंडु लहाने यांच्या फिर्यादीवरून आत्माराम लक्ष्मण लहाने (काका) आणि कविता आत्माराम लहाने (काकू) (दोन्ही रा. एकेफळ, ता. भोकरदन) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार सागर सुगदेव देवकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news