Jalna News : पीएम किसानचा हप्ता मिळाला, 'नमो शेतकरी' महासन्मानचा कधी मिळणार ?

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल, नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हप्ते रखडले, शेतकऱ्यांना प्रतिक्षा
Jalna News
Jalna News : पीएम किसानचा हप्ता मिळाला, 'नमो शेतकरी' महासन्मानचा कधी मिळणार ?file photo
Published on: 
Updated on: 

Received the PM Kisan installment; when will the 'Namo Shetkari' Maha Samman installment be received?

जालना, पुढारी वृत्तसेवाः यंदा जालना जिल्ह्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखवली. परिणामी, शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला. हातचे पिक डोळ्या देखत वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक कुन्हाड कोसळली.

Jalna News
Jalna Agriculture News : दिवाळीपूर्वी 'अग्रिम' रक्कम बँक खात्यावर जमा होणार

अशातच दिवाली पूर्वी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता शुक्रवार, दि. ३० रोजी जमा झाला. मात्र, अजूनही राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ९ व्या आणि १० व्या हप्त्याच्या शेतकरी प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागले असताना आता ख्बी हंगामाच्या पेरण्यांची तयारी सुरू झाली आहे. त्यातच दसरा आणि दिवाळीच्या सणांमुळे ग्रामीण भागातील खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे श्वे आणि १० वे हप्ते अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

या दोन्ही हप्त्यांसाठी एकूण ४ हजार रुपये मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात या पैशांचा आधार मिळू शकतो. शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, मजुरी आणि घरखर्च भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरू शकते. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्हाभरात पिकांचे नुकसान झाले आहे.

धान, सोयाबीन, तूर, भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होतो. आर्थिक अडचणी आणखी वाढतात. आता रब्बी हंगामाच्या पेरण्यांची तयारी सुरू असल्याने बियाणे, खते आणि शेतीच्या इतर कामांसाठी पैशांची गरज आहे. अशा वेळी नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते लवकर मिळावेत, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.

Jalna News
Fraud Case : फेसबुकवरचं प्रेम पडलं महागात; लग्नाचे आमिष दाखवून भामट्याने उकळले ९.३६ लाख

३.०८ लाख खात्यात पीएम किसानचा निधी जमा

यंदा पावसामुळे ओढावलेली दुष्काळी परिस्थिती, पिकांचे झालेलं अतोनात नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जालना जिल्ह्यातील बळीराज्यासाठी दिवाळीच्या तोंडावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २४ वा हफ्ता थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. शासनाकडून मिळणाऱ्या या २ हजार रुपयांच्या मदतीमुळे शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८ हजार ७७ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वर्ग करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता शुक्रवारी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे कळले. मात्र, मला अजून बँकेकडून पैशे जमा झाल्याचा संदेश मिळाला नाही. शिवाय, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा ९ वा आणि १० वा हप्ता मिळाला नाही. दिवाळीपूर्वी शासनाने हा हप्ता जमा करावा. यामुळे दिवाळी गोड होईल.
लिंबाजी वाहूळकर, शेतकरी, सिरसवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.