Petrol Crisis : पेट्रोलची आणीबाणी; पंपांवर वाहनांच्या रांगा

नागरिक त्रस्त; पोलिस बंदोबस्तात पेट्रोलचे वितरण, प्रशासनाकडून उपाययोजना; वितरणावर मर्यादा
Petrol Crisis
Petrol Crisis : पेट्रोलची आणीबाणी; पंपांवर वाहनांच्या रांगाfile photo
Published on
Updated on

Petrol Crisis: Queues of Vehicles at Pumps

जालना, पुढारी वृत्तसेवा सध्या जालना शहरासह जिल्हाभरात पेट्रोलच्या टंचाईच्या भितीने वाहनधारक गर्दी करीत आहे. गेल्या दोन दिवसापासून पेट्रोल पंपावर उन्हातान्हात गर्दी होत आहे. घरगुती गॅसच्या टंचाईसह आता पेट्रोल टंचाईने डोके वर काढले आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे मात्र, पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. गुरूवार, दि. २६ रोजी तर पोलिस बंदोबस्तात पेट्रोलचे वितरण करण्यात आले. दुचाकीधारकांना २०० रुपये तर तीन आणि चारचाकी वाहनांना २००० हजार रुपयापर्यंतच्या मर्यादेत पेट्रोलचे वितरण केले जात आहे. सध्या शहरासह पेट्रोल मिळविण्यासठी वाहनधारकांना मोठी कसरत कारावी लागत आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Petrol Crisis
पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड; पेट्रोल, गॅससाठी नागरिकांच्या रांगा

ालना शहरात अचानक उद्भवलेल्या पेट्रोलच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा पुरवठा खंडित झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून, पंपांवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत असून, अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

इंधनटंचाईमुळे शहरातील दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे. खासगी वाहनधारकांसह रिक्षाचालक, व्यावसायिक आणि प्रवासी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी, दि. २५ रोजी सायंकाळी चार वाजेनंतर शहरातील बहुतांश पेट्रोल पंप बंद झाले होते. तीच परिस्थिती गुरुवार, दि. २६ रोजी देखील पाहायला मिळाली.

Petrol Crisis
Sambhajinagar News : टंचाईच्या अफवेने जिल्हाभरात गोंधळ ; तालुक्यांत वाहनांच्या लांबच लांब रांगा

आपल्या दुचाकी, चारकारी गाड्यात पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी सकाळपासूनच पेट्रोलपंपावर गर्दी केली होती. दुपारी तीन वाजेनंतर शहरातील तीन पेट्रोल पंप पेट्रोल संपल्याने बंद ठेवावे लागले, तर काही पंपांवर मर्यादित प्रमाणातच पेट्रोल दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. इजराइल अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे आखाती देश धगधगत आहेत. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या इंधनावर याचा विपरीत परिणाम पडत आहे.

घरपोच घरगुती गॅस ठप्प; ग्राहकांच्या रांगा

जालना : शहरात घरपोच एलपीजी गॅस वितरणाची सेवा मोठ्या प्रमाणात घटल्याने ग्राहकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर घरपोच न मिळाल्यामुळे नागरिकांना थेट गॅस एजन्सीसमोर उन्हातान्हात तासन्‌तास रांगा लावाव्या लागत आहेत, गॅस बुक झाल्यानंतर ग्राहकांना गॅस एजन्सी येथे पावती दाखवल्यानंतर स्वतः गोदामातून गॅस सिलिंडर आणावे लागत आहे. शिवाय, गॅस सिलिंडर बुकिंगचा वेटिंग पीरियडही वाढल्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पेट्रोल-डिझेल वितरणावर मर्यादा लागू

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात वितरणावर नियंत्रण आणण्यासाठी पुरवठा विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

या नियमानुसार, दुचाकींसाठी फक्त २०० पर्यंत पेट्रोल, तीनचाकी व चारचाकींसाठी २००० पर्यंत इंधन अशा मयदितच इंधन देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चोथे यांनी जारी केले आहेत. अचानक वाढलेल्या मागणीमुळे आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली आहे.

गॅस संपल्याने ऑटोचालक हवालदिल

जालना : शहरातील गांधी चमन परिसरातील एलपीजी गैस पंपावर ऑटोचालकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने ऑटोचालकांनी लांबच लांब रांगा लावल्या, रोजचा व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. गॅस वेळेत न मिळाल्यास उपजीविकेवर परिणाम होणार असल्याने चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पेट्रोल कंपन्यांशी संपर्क साधून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा.
-सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना
पेट्रोल तुटवड्यामुळे आमचे रोजचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच पंपावर जाऊन तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही पूर्ण पेट्रोल मिळेल याची खात्री नसते. कामावर वेळेत पोहोचणे कठीण झाले असून, अतिरिक्त वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा.
-गजानन गाळे, वाहनधारक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news