

पिंपळगाव रेणुकाई ः जिल्ह्यातील नियुक्त अंशकालीन निर्देशांकांना अठरा हजार रुपये प्रति मानधन देण्यात यावे यांसह विविध मागण्यांचे निवेदन कला, क्रीडा, कार्यानुभव संघटनेच्या वतीने प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भागवत मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांना वेळेत मानधन वितरित होत नाही. उशिराने नियुक्ती झालेल्या अंशकालीन निर्देशकांना लवकरात लवकर मानधन देण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या पद्धतीने मानधन निघालेले आहे. त्यामुळे बरेच निर्देशकांवर अन्याय झालेला आहे.
त्यामुळे जिल्हास्तरावरील मानधन अदा करणेबाबत एकाच प्रणालीचा अवलंब करण्यात यावा. पंचायत समिती स्तरावरून मानधन अदा करण्यात येणारा विलंब लक्षात घेता जिल्हास्तरावर रोज मानधन होणारा विलंब लक्षात घेता जिल्हास्तरावर मानधन वितरित करता येऊ शकते का याबाबत विचार करण्यात यावा वरील मागण्या लवकरात लवकर आपल्या स्तरावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
तसेच उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी शासनाने द्यावी, या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सीईओ व शिक्षणाधिकारी यांच्यासोत निदेशकांची सविस्तर चर्चा झाली आहे. यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
यावेळी राजेंद्र गव्हाड, कल्याण धायडे, बाबासाहेब केकान, बाबूसिंग राजपूत, सुनील राठोड, प्रदीप बोर्डे, संदीप देशमुख, आनंद नरवाडे, श्रीमंत वाघमारे, सुमन मगर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीईओ यांच्यासोबत चर्चा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांना अंशकानी निदेशकांनी निवेदन दिले. तसेच सीईओ यांच्यासोबत झालेल्या बैठकी निदेशकांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली. सीईओ यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.