Jalna News : अंतरवाली सराटीमध्ये ओबीसींचेही उपोषण

जरांगे मागण्यांवर ठाम, महिला भावूक
Manoj Jarange, hunger strike
अंतरवाली सराटीमध्ये ओबीसींचेही उपोषणPudhari Photo
Published on
Updated on

Manoj Jarange: OBCs also on hunger strike at Antarwali Sarati

जालना : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण रविवारी (दि. ६) नवव्या दिवशीही सुरूच होते. जरांगे यांच्या उपोषणस्थळी आलेल्या महिला भावूक झाल्याचे दिसले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शासन मागण्यांबाबत करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. दुसरीकडे ओबीसीत कोणत्याही जातीचा समावेश नको, अशी मागणी करीत ओबीसीचे काही कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

Manoj Jarange, hunger strike
Partur rainfall shortage : आष्टी परिसरातील खरीप पिके करपली

अॅड. मंगेश ससाने, विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतरवाली येथील सोनिया नगर येथे रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. व अन्य काही कार्यकत्यांनी दुपारपासून अचानक आंदोलन सुरू केले. त्यामुळे अंतरवालीतील बंदोबस्तात पोलिसांनी वाढ केली आहे.

२ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी ओबीसींची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या नेत्यांनीच आमच्या जागा ओरबाडल्या आहेत. खासदार बारणेंच्या मुलाने, सुनांनी, भावजयांनी ओबीसी जागेवरच निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे, भाजपचा डीएनए ओबीसींचा आहे, असे न म्हणता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळे ईडब्लूएस। आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Manoj Jarange, hunger strike
Goat farming | शेळीपालनात आर्थिक उत्पन्न वाढविण्याची ताकद : बोराडे

महिलांचा इशारा

गेल्या नऊ दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता हळू हळू खालावू लागली असून त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत आहेत. अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या मराठा महिला आंदोलक अत्यंत भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. जरांगे यांनी उपोषण सोडावे, मागण्या मान्य न केल्यास १२ तारखेनंतर मुंबईला जाण्याचा इशारा या महिलांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news