Pankaja Munde | परिस्थिती गंभीर; शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये : पालकमंत्री

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी
Jalna rainfall shortage
जालनाः पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासन दुष्काळाच्या योग्य त्या उपाययोजना हाती घेत असल्याचा धीर दिला.pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना: पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवार, दि.२८ रोजी बदनापूर तालूक्यातील कडेगाव, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी तसेच जालना तालुक्यातील गणेशनगर शिवारातील शेतांमध्ये जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे जालना आणि बदनापूर तालूका दौऱ्यात शेतकरी बांधवांना आधार देत म्हणाल्या की, नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासनाकडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

Jalna rainfall shortage
Chhatrapati Sambhajinagar Crime : तुम पोलिस है तो क्या हुआ ? म्हणत भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याचा समावेश आहे.

पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन केले जात आहे. ज्या भागात चाऱ्याची तीव्र टंचाई आहे, तिथे तातडीने चारा डेपो सुरू करणे आणि गाळपेरा जमिनींचा योग्य वापर करण्याबाबत धोरण आखले जात असल्याचे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Jalna rainfall shortage
Sambhajinagar balwadi teachers honorarium : अखेर मनपा बालवाडी शिक्षिका-सेविकांच्या मुदतवाढीचे आदेश जारी

बँक खात्यात तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना मदतनिधीचे वाटप वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा अधीक्षक गहिनीनाथ कापसे, बदनापूर उपविभागीय अधिकारी लता बागुल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

अपुऱ्या पावसामुळे मत्स्य उत्पादनात घट

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी राजेवाडी आणि सोमठाणा तलावांमधील पाणीसाठा, मत्स्यव्यवसायाची स्थिती आणि मच्छीमारांचे झालेले नुकसानाची याची पाहणी केली. गेल्यावर्षीच्या ७९ टक्के मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन केवळ २० टक्‍के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news