Chhatrapati Sambhajinagar Crime : तुम पोलिस है तो क्या हुआ ? म्हणत भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

कॉलर पकडून मारहाण; मिलकॉर्नर चौकातील घटना; सिटी चौक पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यात दुचाकी आडव्या लावून ट्रकचालकासोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दोन तरुणांनी हल्ला केला. तुम पोलिस है तो क्या हुआ, हम किसीको डरते नही असे म्हणत या तरुणांनी चक्क पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केली आणि नखाने ओरबाडून त्यांना जखमी केले. ही घटना रविवारी (दि. २७) मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास मिल कॉर्नर परिसरातील साई हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सईद जावेद पठाण (२३) आणि फैजल इब्राहिम पठाण (३३, दोघे रा. बेरीबाग, हसूल) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अंमलदार नितिश काकड यांच्या तक्रारीनुसार, रविवारी मध्यरात्री अंमलदार काकड आणि त्यांचे सहकारी शिंदे हे बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. मिल कॉर्नर येथील एमएसईबी ऑफिसजवळ भांडण सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ते तिथे पोहोचले. साई हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या मधोमध दोन दुचाकी आडव्या लावून आरोपींचा एका ट्रकचालकासोबत वाद सुरू असल्याचे त्यांना दिसले.

Crime News
Sambhajinagar Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची अरेरावी, लाठीचार्ज केल्याचा आरोप

अंमलदार काकड आणि शिंदे यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, मात्र, आरोपींनी 'तू बीच मै क्यो आ रहा, तू कोन है, तुझे क्या करना' असे म्हणत पोलिसांशीच हुज्जत घातली. पोलिसांनी आपली ओळख दिल्यावरही आरोपींनी शिवीगाळ सुरूच ठेवली. आरोपी सईदने अंमलदार काकड यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांच्या उजव्या दंडावर नखाने बोचकारून जखमी केले. तसेच, आरोपी फैजल याने अंमलदार शिंदे यांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट करत मारहाण केली.

दरम्यान, डायल ११२ च्या वाहनाला मदतीसाठी बोलावून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर हे करत आहेत.

Crime News
Sambhajinagar balwadi teachers honorarium : अखेर मनपा बालवाडी शिक्षिका-सेविकांच्या मुदतवाढीचे आदेश जारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news