

Jalna district's temperature rises to 40 degrees Celsius.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जालनेकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. २७ मार्चनंतर तापमानाचा आलेख सातत्याने चढता राहिला असून, रविवार १२ एप्रिल रोजी जालन्याच्या तापमानाचा पारा ४० सेल्सिअस पर्यंत पोहोचला. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागले असून, सुर्य आकाशातून आग बरसत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जालनेकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. २७मार्चनंतर तापमानाचा आलेख सातत्याने चढता राहिला असून, रविवार १२ एप्रिल रोजी जालन्याचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. या मोसमातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले असून, जणू काही आकाशातून आग बरसत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या काळात शहरात हॉट ओव्हन सारखी स्थिती निर्माण होत आहे. किमान तापमानही २५ अंशांच्या वर गेल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा कायम राहत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, एप्रिल आणि मे महिन्यात तापमान वाढणे स्वाभाविक असले, तरी यंदा हे प्रमाण लवकर वाढले आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट