जालना : परतूरमध्ये फूटवेअर दुकानाच्या गोडाऊनला आग 

जालना : परतूरमध्ये फूटवेअर दुकानाच्या गोडाऊनला आग 

परतूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य वस्तीत महादेव मंदिर ते गार्डन हॉटेल दरम्यान एक फूट वेअर दुकान आहे. या दुकानाच्या गोडाऊनला आज (दि.११) सायंकाळी सातच्या सुमारास आचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी पाचारण करत आग आटोक्यात आणली.

शहरात महादेव मंदिर चौकातील बाजापेठेत दिवाळीनिमित्त नागरिकांनी गर्दी केली होती. या चौकातून पुढे गार्डन हॉटेलदरम्यान एका नामांकित फूटवेअर दुकानाचे गोडाऊन आहे. कागदी पुठ्ठे असल्याने या गोडाऊनला सायकांळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर परिसरात नागरिकांनी गर्दी करत अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीत किती नुकसान झाले व ही आग कशामुळे लागली. याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news