Government Hospitals : सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट करावे

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश, जालना जिल्हा प्रशासन सतर्क
Fire and electrical audits
Government Hospitals : सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट करावेfile photo
Published on
Updated on

Fire and electrical audits of all government hospitals should be conducted immediately

जालना, पुढारी वृत्तसेवाः अमरावती येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच इतर सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

Fire and electrical audits
Ghansawangi rainfall shortage : कृत्रिम पावसाकरिता शेतकऱ्यांचा प्रयोग

यासंदर्भात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज संबंधित विभागांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग तसेच संबंधित आरोग्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयांच्या सुरक्षा ऑडिटदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची केवळ नोंद करून न थांबता त्यावर तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी. विशेषतः महिला व बाल रुग्णालयातील एसएनसीयू एनआयसीयु, प्रसूती कक्ष, बालरुग्ण विभाग, आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि ऑक्सिजन सुविधा असलेल्या विभागांची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Fire and electrical audits
Sand Mafia : वाळूमाफियांची मुजोरी वाढली; पथकावर हल्ला

या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था सक्षम आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news