

Crime News: Staged His Own Death; Friend murdered and car burned
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारीपणा, वैयक्तिक अडचणी आणि विम्याची रक्कम मिळविण्याच्या हेतूने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत मित्राचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार जाफराबाद तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
३१ मे रोजी सकाळी जाफराबाद-चिखली मार्गावर एका अल्टो कारला अपघात होऊन आग लागून त्यामध्ये एक व्यक्ती जळून मृत झाल्याची माहिती डायल ११२ वर प्राप्त झाली होती. माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रारंभी माहिती देणाऱ्यांनी जळालेला मृतदेह हा नितीन प्रभाकर गवळी याचा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
मात्र तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. नितीन प्रभाकर गवळी याने अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्यासह कट रचल्याचे निष्पन्न झाले. विविध कर्जापासून सुटका मिळविणे, नाशिक येथील एका महिलेच्या त्रासातून मुक्त होणे आणि विम्याची रक्कम मिळविणे या उद्देशाने त्यांनी संदीप चौहाण याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून अपघातात कार पेटल्याने नितीन गवळीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले.
दरम्यान, मृत व्यक्तीची निश्चित ओळख पटविण्यासाठी संदीप चौहाण व त्याच्या पालकांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी मपोको निकम यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक तेगबिर सिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन आर- ोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रध- ाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
संदीप चौहाण यांचा गळा दाबून खून
मात्र तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. नितीन प्रभाकर गवळी याने अमित राजू फुलारे आणि आकाश यांच्यासह कट रचल्याचे निष्पन्न झाले. विविध कर्जापासून सुटका मिळविणे, नाशिक येथील एका महिलेच्या त्रासातून मुक्त होणे आणि विम्याची रक्कम मिळविणे या उद्देशाने त्यांनी संदीप चौहान याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून अपघातात कार पेटल्याने नितीन गवळीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले.