Jalna Crime : चोरी गेलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत; हसनाबाद पोलिसांची कारवाई

हसनाबाद व राजूर आठवडे बाजारातून ३ लाख ३५ हजारांचे मोबाईल लंपास
Jalna Crime
भोकरदनः चोरी गेलेले मोबाईल मूळ मालकांना हसनाबाद पोलिसांच्यावतीने परत करण्यात आले. यावेळी उपस्‍थित अधिकारी, कर्मचारी.pudhari photo
Published on: 
Updated on: 

भोकरदन: हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील राजूर येथील आठवडे बाजार आणि हसनाबाद परिसरातून चोरी गेलेले व गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ३,३५,००० रुपये किमतीचे एकूण १३ मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हसनाबाद परिसरातून मोबाईल गहाळ झाल्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने हसनाबाद पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.

Jalna Crime
Sanjay Lakhe Patil : मंत्री विखे पाटील मराठा समाजाला भूलविण्याचे काम करताहेत

यामध्ये मोबाईलचे IMEI नंबर, सिमकार्ड नंबर इत्यादी माहिती CEIR पोर्टलवर भरून त्यावरून प्राप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तसेच मोबाईलचे CDR (कॉल डिटेल्स), टावर लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने विविध ठिकाणांवरून वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल शोधून काढले.

हे सर्व मोबाईल हस्तगत केल्यानंतर संबंधित मूळ मालकांना हसनाबाद पोलिस ठाण्यात बोलवून त्यांचे मोबाईल सन्मानपूर्वक परत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Jalna Crime
Sambhajinagar property tax recovery : कर थकलेल्या २१ व्यावसायिक मालमत्ता सील

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई हसनाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश उबाळे, पोउपनि. सखाहरी तायडे, पोउपनि अर्चना भोसले, पोहेकॉ नरहरी खार्डे, पोहेकॉ गजानन काकड, पोहेक जगदीश बावणे, पोहेकॉ दुर्गेश राठोड, पोकॉ नारायण चरावंडे, पोकॉ दीपक सोनुने, पोकॉ प्रकाश बोर्डे, पोकॉ नीलेश खराट, पोकॉ राहुल भागीले आणि पोकॉ सतीश शेजूळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news