Sanjay Lakhe Patil : मंत्री विखे पाटील मराठा समाजाला भूलविण्याचे काम करताहेत

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक लाखे पाटील यांचा पत्रपरिषदेत आरोप
Maratha reservation Maharashtra
जालनाः पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना संजय लाखे पाटील.pudhari photo
Published on
Updated on

जालना : हैदराबाद गॅझेटमध्ये विशिष्ट गावातील नाव, आडनाव अशी नोंदच नाही. तर वंशावळ कशी जुळणार असा सवाल उपस्‍थित करत सध्या प्रशासनाने जाहीर केलेल्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती किंवा प्रशिक्षण शिबीर ही हैदराबाद संस्‍थान मधल्या मराठ्यांची शुध्द फसणवणूक असून, मराठा समाजाला भूलविण्याचे काम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करीत आहे. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला.

शुक्रवार, दि. ४ रोजी त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयाचा अधार घेतला. ते म्हणाले, या आदेशात दुरूस्ती केली तरच मराठ्यांना न्याय मिळणार आहे. कारण, मराठा समाजाची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. त्यात मराठ्यांचा दर्जा कल्टीवेटर मध्ये होतो. तो ओबीसींच्या समकक्ष आहे. हे अगोदर सिध्द करावे लागणार आहे. त्यानंतर वंशावळ सिध्द करावी लागेल. मात्र, मंत्री विखे पाटील या उलट करत आहे. आधी माणसं घालत असून, नंतर ‘जात’ घातल्या जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे.

Maratha reservation Maharashtra
Jalna self employment schemes : स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नतीची वाट; मुद्रा, महामंडळाचा आधार !

यामुळे मराठ्यांना प्रमाणपत्र मिळणे अवघड होत आहे. शिवाय, जात समित्या बरखास्त करणे हे वक्‍तव्य देखील ते चुकीचे करत आहे. मराठ्यांना लाभ मिळवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाचे काम केले असून, कृतज्ञा म्हणून शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Maratha reservation Maharashtra
Chhatrapati Sambhajinagar crime : बुलेटच्या चावीवरून दोन गटांत हाणामारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news