Sambhajinagar property tax recovery : कर थकलेल्या २१ व्यावसायिक मालमत्ता सील

महापालिकेकडून कर वसुलीला वेग : १४.९२ लाखांची वसुली, झोन ८ मध्ये १२ दुकानांवर कारवाई
Sambhajinagar property tax recovery
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने कारवाईचा वेग वाढविला असून, सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ४) शहरातील २१ व्यावसायिक मालमत्तांवर सील ठोकण्यात आले. विविध झोनमध्ये झालेल्या या कारवाईत थकबाकीदारांकडून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक कारवाई झोन ८ मध्ये झाली असून या कार्यालयातंर्गत येणाऱ्या आमदार रोड आणि सातारा परिसरातील १२ दुकानांना सील करण्यात आले.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी (दि.३) थकीत मालमत्ता कराचा भरणा करून कारवाई टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गद-र्शनाखाली उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांनी सर्व झोनमधील कर वसुली पथकांना थकबाकीदारांच्या याद्या देऊन कठोर कारवाईच्या सूचना केल्या होत्या.

Sambhajinagar property tax recovery
Sambhajinagar Crime : महिला पोलिसाला पतीसह सासरच्यांची मारहाण

त्यानुसार झोन १ च्या पथकाने दोन मालमत्ता सील करून १ लाख ४२ हजार रुपयांची वसुली केली. झोन ५ मध्ये एका मालमत्तेवर कारवाई करत तब्बल ८ लाख १७ हजार रुपये वसूल झाले. झोन ६ मध्ये दोन, तर झोन ७ मध्ये तीन मालमत्ता सील करण्यात आल्या. यात झोन ७ मध्ये एका मालमत्ताधारकाकडून १ लाख ६३ हजार रुपये कर वसूल करण्यात आला.

तसेच झोन ९ मध्ये एका मालमत्तेवर कारवाई करून २ लाख रुपये वसूल करण्यात आले. तर झोन १० च्या पथकाने तीन मालम-त्तांवर कारवाई करत १ लाख ७० हजार रुपयांची वसुली केली. दरम्यान, थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतरच संबंधित मालमत्तेवरील सील काढण्यात येईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मालमत्ताधारकांनी थकीत कराचा तातडीने भरणा करून जप्ती अथवा सीलच्या कारवाईपासून स्वतःची मालमत्ता वाचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Sambhajinagar property tax recovery
Chhatrapati Sambhajinagar prison : हसूल तुरुंगाच्या भिंतीआड फुलतेय 'शिक्षणाची बाग'

झोन ८ मध्ये १२ दुकाने सील

झोन ८ च्या पथकाने सहायक आयुक्त भारत बिरारे यांच्या नेतृत्वाखाली आमदार रोड आणि सातारा परिसरातील थकीत मालमत्ता कर असलेल्या तब्बल १२ दुकानांना सील केले. यावरून व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून कर थकविला जात असल्याने महापालिकेने आता थेट सीलची कारवाई सुरू केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news