जालना : पिस्टल, चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटली | पुढारी

जालना : पिस्टल, चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटली

परतूर; पुढारी वृत्तसेवा : स्पंधना स्फुर्ती फायनान्सच्या कार्यालयात चार अज्ञात चोरट्यांनी घुसून कर्मचार्‍यांना मारहाण करून पिस्तूल आणि चाकूच्या धाकाने २ लाख ४६ हजार ५७० रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना बचत गट तयार करून त्यांना कर्ज वाटप करण्याचे काम ही संस्था करते.

स्पंधना स्फुर्ती फायनान्सचे व्यवस्थापक सिद्धांत श्रीराम हराळ यांनी परतूर पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. स्पंधना स्फुर्ती फायनान्सचे कार्यालयात लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय रस्त्यावर आहे. येथे महिन्याच्या सुरवातीस वसूली करून तीन खोल्यांपैकी दोन खोल्यात पैसे मोजण्याचे कामकाज कर्मचारी करत होते. यावेळी चार अनोळखी व्यक्ती तोंडाला कापड बांधून ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांना चाकू व पिस्टलाचा धाक दाखवत दोन लाख ४६ हजार ५७० रुपये रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button