बीड: आवरगाव येथील एकाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले

बीड: आवरगाव येथील एकाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील आवरगाव येथील गणेश विठ्ठलराव नखाते (वय ५०) यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत असल्याच्या कारणातून आपले जीवन संपवले. ही घटना आज (दि. १) दुपारी उघडकीस आली. Maratha reservation

गणेश नखाते यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही, या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे की, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत आहेत. २० जानेवारीपर्यंत आरक्षण देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. तसेच मी कोणालाही दोषी ठरवत नसून फक्त सरकारने मराठा आरक्षण द्यावे. याकरिता मी माझे जीवन संपवत आहे. Maratha reservation

दरम्यान, या घटनेमुळे आवरगाव, हसनाबाद, धारूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात्य मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news