जालना : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक; दोन जण ठार

दोन मोटारसायकलींची धडक
दोन मोटारसायकलींची धडक

आष्टी ; पुढारी वृत्‍तसेवा दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार तर, अन्य एक गंभीर जखमी झाले. हा अपघात आष्टी-कुंभार पिंपळगांव रस्त्यावरील वाहेगांव जवळ (सोमवार) रात्री 7 वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात विक्रम अर्जुन राठोड (वय 23) रा.कोकाटे हादगांव तांडा ता. परतूर) व दुसरा मोटारसायकलस्वार अशोक रामा ढेरे (वय 27) रा.बोडखा (ता.घनसांवगी) यांचा जागीच मृत्यू झाला.

विक्रम राठोडच्या सोबत गंभीर जखमी असलेल्या साथीदारास जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आष्टी पोलिस ठाण्यात आपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहेत.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news