जालना: वडीगोद्री परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून ६ जनावरे दगावली

जालना: वडीगोद्री परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून ६ जनावरे दगावली
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : विजेच्या कडकडाटासह आज (दि.२८) दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वडीगोद्री परिसरात वडीगोद्री, अंतरवाली सराटी, दोदडगाव, सौन्दलगाव, चंदनापुरी, भांबेरी, व बारसवाडा या ठिकाणी वीज पडली. या दुर्घटनेत तीन म्हशी, दोन बैल व एक गाय दगावली.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरातील वडीगोद्री, अंतरवाली सराटी, दोदडगाव, सौन्दलगाव, चंदनापुरी, भांबेरी व बारसवाडा या ७ ठिकाणी वीज पडल्या आहेत. यामध्ये दोदडगाव येथील बबन नरहरी गावडे यांची एक म्हैस, वडीगोद्री येथील मनीषा गोपाल गिरी यांची म्हैस, भांबेरी येथील मच्छिंद्र सूर्यभान कनके यांची एक म्हैस, चंदनापुरी येथील राजू अंकुश चाबुकस्वार यांची एक गाय, अंतरवाली सराटी येथील शहादेव भगवान चौधरी यांचा एक बैल. तर बारसवाडा येथील किरण शेषराव वाकडे यांचा एक बैल दगावला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश गिरी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

वडीगोद्री परिसरात सहा जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news