Hingoli News : स्मार्ट थ्रेशर रोखणार मळणी यंत्रावरील मजुरांचे अपघात

इडोळीच्या विद्यार्थ्यांच्या उपकरणाला राज्यात पहिला क्रमांक
hingoli news
स्मार्ट थ्रेशर रोखणार मळणी यंत्रावरील मजुरांचे अपघातfile photo
Published on
Updated on

Smart Thresher to Prevent Accidents Involving Laborers on Threshing Machines

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात आता मळणी यंत्रावर काम करताना शेजमजुरांचे अपघात रोखणे शक्य होणार असून त्यासाठी हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी टू स्टेज स्मार्ट थ्रेशर हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाला राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

hingoli news
Parbhani News : कौसडीत अवतरले 'रयतेचे राजे'! ३९६ विद्यार्थ्यांनी १२०० चौ. फुटांत साकारली शिवरायांची भव्य प्रतिकृती

राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व लिडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने १६ मार्च ते १८ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थिनी तेजल जाधव, वेदिका जाधव, अनुराधा टेकाळे यांनी शिक्षिका दीपाला ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करून उपकरणाची माहिती दिली. त्यानंतर त्यांना आयोजकांकडून विविध आठ ते दहा प्रकारचे सेन्सर व इतर पार्टचा पुरवठा करण्यात आला.

या सेन्सरमध्ये कोडिंग करून व पार्टच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्मार्ट थ्रेशर हे उपकरण तयार केले. सध्या पिकांची मळणी करताना मळणी यंत्रात पीक टाकताना थोडीही चूक मजुरांच्या जिवावर बेतते. यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने उपघात होतात. सदर अपघात रोखण्यासाठी विद्यार्थिनींनी स्मार्ट थ्रेशर तयार केले. यामध्ये टू स्टेज लावण्यात आल्या आहेत. यामध्ये मळणी यंत्रामध्ये हात सुरक्षित अंतराच्या पुढे जात असल्यास लगेचच अलार्म वाजतो व धोक्याची सूचना मिळते तर मळणी यंत्रात सुरक्षित अंतराच्या पुढे गेल्यानंतर अलार्म वाजून मळणी आपोआप बंद पडते.

hingoli news
पुढारी टॅलेंट सर्च उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना

या उपकरणामुळे शेतमजुरांचे अपघात टाळणे शक्य होणार असल्याचे दाखवून देण्यात आले. पुणे येथे झालेल्या हॅकेथॉन स्पर्धेत या उपकरणाचे सादरीकरण करण्यात आले. इडोळी सारख्या ग्रामीण भागातील शाळेने शेतकऱ्याच्या महत्त्वाच्या समस्येवर तयार केलेल्या उपकरणाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल विद्यार्थिनी तेजल जाधव, वेदिका जाधव, अनुराधा टेकाळे, मार्गदर्शक शिक्षिका दीपाली ढोले यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे कौतुक

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, केंद्र प्रमुख बी. जी. मुटकुळे, मुख्याध्यापक अशोक देवकर, शिक्षक संजय भक्कड, बंडू पुरी, अनिता जाधव, मनीषा पवार, सतीश कापसे, राजेश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे हनुमान जाधव, भानुदास जाधव, रामेश्वर टेकाळे, विठ्ठल जाधव, शिवाजी टेकाळे, वैजनाथ जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news