Hingoli News : एक सप्टेंबरला मुंबईत आंदोलन : प्रा. लक्ष्मण हाके

राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले असून आरक्षण संपविणाऱ्यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आंदोलन केले जाणार
Lakshman Hake
Lakshman HakePudhari File Photo
Published on
Updated on

Protest in Mumbai on September 1: Prof. Lakshman Hake

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले असून आरक्षण संपविणाऱ्यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आंदोलन केले जाणार असून यामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना केला.

Lakshman Hake
Hingoli News : सेनगावमध्ये रस्त्यासह पुलाच्या कामासाठी दीड तास 'रास्ता रोको'

हिंगोली येथील शासकीय ओबीसी विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रा. हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आरक्षण समितीचे जिल्हा समन्वयक अॅड. रवी शिंदे, दिनकर कोकरे, एकनाथ कुटे, विलास आघाव, वैजनाथ पावडे, डॉ. नागोराव जांबूतकर, अशोक श्रीरामे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Lakshman Hake
Illegal Sand Mining : सेनगाव पोलिसांची रेती माफियांविरुद्ध कारवाई

यावेळी बोलताना प्रा. हाके म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान व्हि. पी. सिंग यांनी लागू केलेल्या मंडल आयोगामुळे ओबीसींच्या आयुष्यात नवीन पर्व आले होते. मात्र मागील तीन ते चार वर्षांत राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असून स्वातंत्र्यांच्या लढ्याप्रमाणे पुन्हा एकदा ओबीसींच्या हक्काचा लढा उभा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news