Vasmat Hospital Viral Video | वसमत उपजिल्हा रुग्णालयात सिझर ऑपरेशनसाठी पैशांची मागणी; व्हिडिओ व्हायरल

आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Vasmat Sub District Hospital
Vasmat Sub District HospitalPudhari
Published on: 
Updated on: 

Vasmat Sub District Hospital

वसमत : वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सिझर ऑपरेशनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारांसाठीही पैसे मोजावे लागणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सिझर ऑपरेशनच्या संदर्भात पैशांची मागणी होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता आणि पैशांची मागणी नेमकी कोणी व कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

Vasmat Sub District Hospital
Nanded Vasmat market turmeric price| वसमत बाजारात हळदीला २८ हजारांचा ऐतिहासिक भाव; विडुळसह उमरखेडच्या शेतकऱ्यांना दिलासा

दरम्यान, यापूर्वी याच रुग्णालयातील डायलिसिस सेवेदरम्यान रुग्णांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता सिझर ऑपरेशनसाठी पैशांची मागणी केल्याचा कथित व्हिडिओ समोर आल्याने रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शासकीय रुग्णालयात गरीब आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात. प्रसूतीसारख्या संवेदनशील प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांना पैशांसाठी अडचणीत आणले जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून व्हिडिओतील सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vasmat Sub District Hospital
Vasmat Hunger Strike | नमुना 8 रद्द केल्याप्रकरणी मुक्ती संग्राम दिनीच आमरण उपोषण सुरू

वैद्यकीय अधीक्षकांची भूमिका काय?

या संपूर्ण प्रकरणात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे यांनी पुढाकार घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करणे अपेक्षित आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी होणार का? पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई होणार का? की हे प्रकरणही चौकशीच्या नावाखाली थंड बस्त्यात जाणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

शासकीय रुग्णालयातील उपचारसेवा मोफत आणि पारदर्शक असाव्यात, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.