Vasmat Hunger Strike | नमुना 8 रद्द केल्याप्रकरणी मुक्ती संग्राम दिनीच आमरण उपोषण सुरू

मराठवाडा मुक्त होऊन 78 वर्षे झाली तरी वसमत तालुक्यातील भाग्यनगरवासीय पारतंत्र्यातच
Vasmat Hunger Strike
नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वसमत येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.Pudhari
Published on
Updated on

Vasmat Hunger Strike

वसमत : एकीकडे गुरूवारी (दि. 17) संपूर्ण मराठवाड्यात 78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे वसमत तालुक्यातील भाग्यनगर, हट्टा येथील नागरिकांना मात्र आजही आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे. शासनमान्य खरेदीखत होऊन 6 वर्षे उलटूनही नमुना नंबर 8 रद्द करण्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आजपासूनच (दि. 17) उपविभागीय अधिकारी कार्यालय, वसमत येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

मुक्ती संग्राम दिनाचेच औचित्य साधून या नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाडा निजामशाहीतून मुक्त होऊन 78 वर्षे झाली, तरी आम्ही आजही महसूल दफ्तरातील जोखडातून मुक्त झालो नाही, अशी व्यथा उपोषणकर्त्यांनी मांडली.

Vasmat Hunger Strike
Hingoli News: हिंगोलीतील धरणग्रस्तांवर अन्याय, प्रशासनाचा 'तो' अहवाल रद्द करा; पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी

उपोषणकर्त्यांचा आरोप -

आम्ही भाग्यनगर, हट्टा येथील कायम रहिवासी असून शासनमान्य खरेदीखत करूनही आमचा नमुना नंबर 8 प्रशासनाने परस्पर रद्द केला. त्यामुळे गेल्या 6 वर्षांपासून आम्हाला एकाही शासकीय योजनेचा घरकुल, शौचालय, पीकविमा, शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळालेला नाही. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आजचा दिवस निवडावा लागला.

प्रमुख मागण्या -

1) रद्द करण्यात आलेला नमुना नंबर 8 तात्काळ पूर्ववत करावा.

2) 6 वर्षांपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यावा.

3) या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news