Farmer Death Hingoli | पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह झुडपात आढळला

वसमत तालुक्यातील कोर्टा येथील घटना
Vasmat Farmer Dead Body Found
Vasmat Farmer Dead Body FoundPudhari
Published on
Updated on

Vasmat Farmer Dead Body Found

वसमत : वसमत तालुक्यातील कोर्टा येथील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी गजानन प्रल्हाद भोकरे (वय २६) यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसानंतर गजानन भोकरे हे मंगळवारी (दि. 30 जून) आपल्या शेतात गेले होते. रात्री शेतातून गावाकडे परतत असताना रस्त्यातील एका ओढ्याला अचानक पूर आला. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेले.

रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. अखेर दि. 2 जुलै रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोधमोहीम राबविण्यासह त्यांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.

Vasmat Farmer Dead Body Found
Hingoli News : मान्सूनच्या प्रतीक्षेत खरिपाची पेरणी लांबणीवर

दरम्यान, शुक्रवारी (दि. 3) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जनावरे चारण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना ओढ्याच्या काठावरील झुडपात गजानन भोकरे यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ गावकऱ्यांना व कुरुंदा पोलीस ठाण्याला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी भगीरथ सावरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Vasmat Farmer Dead Body Found
Hingoli rain news | मान्सून प्रतिक्षात खरिपाची पेरणी लांबणीवर पडली
Vasmat Farmer Dead Body Found
Hingoli News : चोर सोडून संन्‍याशाला फाशी

मृत गजानन भोकरे यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेले गजानन हेच कुटुंबाचा प्रमुख आधार होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news