Hingoli News : मान्सूनच्या प्रतीक्षेत खरिपाची पेरणी लांबणीवर

मान्सून रेंगाळत असलयाने पावसाचे दोन नक्षत्र संपत येत असुन खरीप हंगामातील पेरणा खोळंबल्या आहेत.
Hingoli Kharif Season
Hingoli News : मान्सूनच्या प्रतीक्षेत खरिपाची पेरणी लांबणीवरpudhari photo
Published on
Updated on

Hingoli News: Kharif sowing delayed while awaiting the monsoon

जवळा बाजार : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामातील पेरणीस मृग नक्षत्रात पेरणीस योग्य पाऊस पडेल म्हणून शेतकरी बांधवाकडून मोठ्याप्रमाणात खरीप हंगामातील पेरणीस तयारी करून ठेवण्यात आली पण मृग नक्षत्रा बरोबर आर्द्रा नक्षत्र लागुन आठ दिवस झाले पण पाऊस पडला नाही आता पावसाचे तिसरे पुनर्वसू नक्षत्र ६ जुलै लागणार आहे तरी पण पावसाची प्रतिक्षा मात्र करावी लागत आहे मान्सून रेंगाळत असलयाने पावसाचे दोन नक्षत्र संपत येत असुन खरीप हंगामातील पेरणा खोळंबल्या आहेत.

Hingoli Kharif Season
Hingoli rain news | मान्सून प्रतिक्षात खरिपाची पेरणी लांबणीवर पडली

सध्याच परिस्थितीत हवामान अंदाज विविध व्यक्त करण्यात येत असल्याने शेतकरी बांधवाचे आकाशाकडे डोळे लागले असून अंदाज मात्र अजून पेरण्यायोग्य पाऊस झाला नाही तर खरीप हंगामातील पेरणीस या वर्षी सुध्दा विलंब होणार अशी परिस्थितीत सध्याच काळात निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरणीस विलंब झाला तर उत्पादित मालावर मोठ्याप्रमाणात परिणाम होत असतो.

अर्थिक नियोजन संपूर्ण वर्षभर शेतातील खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह, सर्व नियोजन खरीप हंगामातील उत्पादित मालावर अवलंबून असते मृग नक्षत्र संपले आर्द्रा नक्षत्राचे आठ दिवस राहिले असून परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले पण अजुन तरी जोरदार पाऊस सुरूवात झाली नाही आर्द्रा नक्षत्र आठ दिवस कालावधीत तिन चार मुसळधार पाऊस झाले तर शेतकऱ्यास पेरणीचे नियोजन आर्द्रा नक्षत्रास करता येईल पण सध्याच परिस्थितीत मोठ्याप्रमाणात मुसळधार पाऊस झाला तर भविष्यात पिण्यास पाणी प्रश्न मार्गी लागण्यास उपयोग होईल.

Hingoli Kharif Season
Latur News : पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त; पेरणी कधी होणार?

एकंदरीत पावसाचे आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याने आता पावसाची तिसरे नक्षत्र आठ दिवस नंतर पुनवसु लागणार असून या नक्षत्र अगोदर पाऊस झाला तर श्री विठ्ठल माऊलीचा आषाढी एकादशीनिमित्त खरीप हंगामातील पेरणी करून दर्शन घेण्याचे भाग्य मात्र सध्याच परिस्थितीत ढगाळ वातावरण मध्ये निसर्ग अवकृपातुन जोरदार पाऊस पडेल अशी शेतकरी बांधवास प्रतिक्षा लागली. पावसाचे दुसरे आर्द्रा नक्षत्रास आठ दिवस झाले पण पाऊस नसलयाने पेरणीस विलंब होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news