Abhijeet Dipke CJP Impact: दिपकेंचा दणका... दारूडे मुख्याध्यापक हटवले, शाळेला ४ नवीन शिक्षकही मिळाले

Abhijeet Dipke CJP Impact
Abhijeet Dipke CJP Impactpudhari
Published on
Updated on

Abhijeet Dipke CJP Impact: कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेने हिंगोली जिल्ह्यातील दौऱ्यावेळी संतुक पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेची तपासणी केली होती. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांवर दारूच्या नशेत असल्याचा आरोप झाले होते. त्यांच्या निलंबनाची मागणी देखील झाली होती.

Abhijeet Dipke CJP Impact
Abhijeet Dipke Police Controversy: दिपकेंनी माफी मागावी नाहीतर हात उपसले जातील... महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आक्रमक

चार नवे शिक्षक अन् बेंच

आज अभिजीत दिपके यांनी पुन्हा गावाचा दौरा केला आणि चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. दिपके यांनी सांगितलं की प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी मान्य केली आहे. त्यांनी मुख्याध्यापकांना निलंबित केले असून शाळेत त्वरित ४ शिक्षक नियुक्त करण्यावर देखील सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर आता गावातील शाळेत बेंच देखील आले आहेत.

अभिजीत दिपकेच्या मते सर्व राज्यांमध्ये शाळांची चांगली व्यवस्था मिळावी यासाठी आंदोलन सुरू झालं आहे. दिपकेंच्या मते सरकार आता शाळांच्या अवस्थेबाबतचं वास्तव लवपण्याचा प्रयत्न करत आहे. अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधत कितीही लपवलं तरी शाळांच्या अवस्थांचे वास्तव बदलणार नाहीये.

Abhijeet Dipke CJP Impact
Abhijeet Dipke Video: 'तुम्ही बाहेर जा, तुम्हाला काय...?', अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद, PSIला घराबाहेर काढलं

अब्दुलबाबत देखील केलं वक्तव्य

अभिजीत दिपकेने सांगितले की अब्दुल त्याच्यासोबत जंतर मंतर आंदोलनात होता. ज्यावेळी शाळा ठीक करा हे आंदोलन सुरू केलं त्यावेळी अब्दुल हा बंगालमध्ये गेला. तिथं त्याने शाळांचे निरीक्षण केले. त्यावेळी काही लोकांनी अब्दुलला मारहाण केल्याचा आरोप दिपकेंनी लावला आहे. यावेळी अब्दुलच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. दिपकेंनी अब्दुल हा माझ्या कुटुंबासारखाच माझ्या भावासारखाच आहे.

अभिजीत दिपकेंनी गेल्या १० वर्षात देशात द्वेशाचं राजकारण होत आहे. अब्दुल आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्याच राजकारणाचे बळी पडले आहेत. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले असून अब्दुल आणि त्यांच्या वडिलांचा हा विजय आहे. जोपर्यंत सर्व शाळांची अवस्था चांगली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असे देखील अभिजीत दिपके यांनी ठणकावून सांगितलं.

Abhijeet Dipke CJP Impact
Abhijeet Dipke: पंतप्रधान मोदींच्या हातमाग दिनाच्या व्हिडिओवर अभिजित दिपकेंची अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाले...

आता देशातील अनेक भागात जेन अल्फा हे चांगली शिक्षण व्यवस्था आणि शाळांच्या वाईट अवस्थेमध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी आवाज उठवत आहेत. अनेक राज्यात शाळांची परिस्थिती सुधारावी आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात ही मागणी वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news