

Abhijeet Dipke Police Controversy: गेल्या काही दिवसांपूर्वी अभिजीत दिपके यांच्या घराजवळ साध्या कपड्यात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला आवारातून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अभिजीत दिपके यांच्याविरूद्ध महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आक्रमक झाली आहे.
ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा दिपके यांनी अपमान केला अन् त्यांना चांगली वागणूक दिली नाही त्यांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे. तसेच दिपके यांचे पोलीस संरक्षण त्वरित काढून घेण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढले होते. या घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आक्रमक झाली असून, आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मूक निदर्शने करण्यात आले. अभिजीत दिपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तातडीने काढून घेण्यात यावे, तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी झालेल्या प्रकाराबद्दल दिपके यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
पोलीस अधिकारी बंदोबस्तावर असताना त्यांच्याशी अशा प्रकारे वर्तन करणे योग्य नसल्याचे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला.
आंदोलकांनी, ज्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान झाला ते तुमच्या वडिलांच्या वयाचे होते. त्यांचे तुम्ही पाय पकडून माफी मागावी. त्यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून टाकावे अन्यथा आम्हाला चक्का जाम करावा लागेल. आम्ही तुम्हाला लोकशाही मार्गानं रस्त्यावर उत्तर देऊ असं देखील आंदोलक म्हणाले.
यानंतर दिपकेंच्या समर्थकांनी देखील याा प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी जो अधिकारी दिपकेंच्या घराबाहेर तैनात होता त्याच्या गळ्यात आयडी कार्ड नव्हते. हे पोलीस प्रशासनाला देखील कळायला हवं. आता पोलीस बॉईज असोसिएशन आंदोलन करत आहे.
फडणवीस साहेब तुम्ही असे कितीही बॉईज उभे केले तरी काय उपयोग होणार नाही. ज्यावेळी दलित संघटना आक्रमक होतील त्यावेळी अशा बॉईज संघटनांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी आता अभिजीत दिपके यांची माफी मागावी. ते जर हात उचलण्याची भाषा करत असतील तर त्यांचे पायही जागेवर राहणार नाहीत.