हिंगोली : सेनगावात शिक्षकावर कोयत्याने हल्ला | पुढारी

हिंगोली : सेनगावात शिक्षकावर कोयत्याने हल्ला

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथे राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकावर शुक्रवारी (दि.१९) कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मा.शी.कोटकर असे या शिक्षकाचे नाव असून त्यांच्यावर हिंगोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोटकर हे रात्री सातच्या सुमारास घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात कोटकर गंभीर जखमी झाले. तोंडाला रूमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी लगेच तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने सेनगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सेनगावचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, जमादार सुभाष चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button