मटका, जुगार, सट्टा जोमात
मटका, जुगार, सट्टा जोमात

नगर : संगमनेरात ५ मटका अड्ड्यांवर छापा : ९ जणांवर गुन्हे दाखल

Published on

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा : संगमनेरसह परिसरातील मटका अड्ड्यांवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत मटक्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह ११ हजारांची रोकड हस्तगत केली. याप्रकरणी मटका चालकासह ९ जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुख्य मटका किंग शरद द्वारका शर्मा पोलिसांना पाहून फरार झाला आहे.

जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलीस पथकातील हवालदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल, पोलीस नाईक किशोर शिरसाट, शिवाजी आढाव, संगमनेरचे हवालदार अजित कु-हे, बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने शहरातील प्रवरा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार अड्डासह घुलेवाडी फाटा, संजय गांधीनगर, जयजवान चौक, माळीवाडा, कासट व्यापारी संकुल, अकोले नाका, नवघर गल्ली, चिखलीचा येडू आई मंदिर परिसर अशा विविध ठिकाणी टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकले.

या प्रकरणी सिद्धांत रमेश जाधव, शरद द्वारका शर्मा, शुभम बाळू कालेकर, धनंजय धनराज कतारी, राजेंद्र बाबुलाल ओझा, राम गोरक्ष बर्डे, संतोष रूपचंद पवार, संजय चंद्रभान केरे, संतोष विठ्ठल उदावंत आदी ९ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेतील मुख्य मटका किंग शर्मा हा फरार झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news