

वसमत; पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यात २७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने रब्बी हंगामातील हरभरा, तूर, कापूस, ज्वारी, हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मगाणी वसमत तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी देण्यात आले.
निवेदनावर शिवलिंग पवार, रविराज देशमुख, बाळासाहेब बारहाते, दिलीपराव जाधव, माऊली जाधव, दत्तराव जाधव, भगवान नेमाडे, नंदू कंगळे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा :