हिंगोली: अवकाळीचा पूर्णा साखर कारखान्याला फटका; गोडाऊनमधील ५०० मे. टन साखर भिजली | पुढारी

हिंगोली: अवकाळीचा पूर्णा साखर कारखान्याला फटका; गोडाऊनमधील ५०० मे. टन साखर भिजली

वसमत: पुढारी वृत्तसेवा : पूर्णा साखर कारखान्याच्या शुगर हाऊस – शुगरसायलो व गोडाऊनमध्ये रविवारी (दि.२६) मध्यरात्री झालेल्या वादळी वा-यासह मुसळधार पाऊसामुळे पाणी आले. त्यामुळे गाळप काही वेळासाठी थांबवावे लागले.

दरम्यान, गाळप केलेली साखरेची पोती शुगर हाऊस, शुगरसायलो व गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. पावसाच्या पाण्यामुळे गोडाऊनमधील अंदाजे ५०० मे. टन साखर भिजली आहे. तर पाणी शिरल्याने पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होण्यात अडचण येत आहेत. त्यामुळे कारखाना पूर्ववत करण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस लागणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button