छत्रपती संभाजीनगर : नाथसागर धरणातील पाण्याचे जलपूजन संपन्न | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : नाथसागर धरणातील पाण्याचे जलपूजन संपन्न

पैठण : पुढारी वृत्तसेवा (चंद्रकांत अंबिलवादे) मराठवाड्यातील नाथसागर धरणाला मिळालेल्‍या पाण्याचे जलपूजन संपन्न
मराठवाड्यातील नाथसागर धरणात हक्काचं पाणी मिळावा यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेल्या पाण्याचे जलपूजन आज (बुधवार) सकाळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले आहे.

पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पैठण येथील नाथ सागर धरणाची पाणी परिस्थिती चिंताजनक बनली होती. त्‍यामुळे मराठवाड्यातील नाथसागर धरणात हक्काचं पाणी मिळाव यासाठी मराठवाड्यातील विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी न्यायालयात लढा देऊन व आंदोलन करून जलसंपदा विभागाला वरील धरणातून नाथ सागर धरणात पाणी सोडण्यास भाग पाडले. गेल्या दोन दिवसांपासून येथील नाथसागर धरणात हक्काचं पाणी मिळू लागले आहे.

या पाण्याचं जलपूजन आज (बुधवार) सकाळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले माजी आमदार कल्याण काळे, संजय वाकचौरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हरिचंद्र लघाने, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद तांबे, अशोक पटवर्धन, माऊली मुळे, विशाल वाकचौरे, बद्रीनारायण भुमरे यांच्या हस्ते पाण्याचं जल पूजन करण्यात आले. यावेळी गोदावरी मातेची आरती करून. साडी चोळी, श्रीफळ अर्पण करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर सर्व पक्षातील राजकीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button