हिंगोली : औंढा नागनाथ येथे गणेश उत्सवानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ येथे गणेश उत्सवानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्या एकूण १०२ गणेश मंडळाची स्थापना तर ४० ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवली आहे. यामध्ये औंढा नागनाथ येथे एकूण २२ गणेश मंडळ असून ग्रामीण परिसरात ५७ गणेश मंडळे हे परवाना कृत असून २३ मंडळांनी विनापरवानगी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

ग्रामीण परिसरात एकूण ८० गणेश मंडळांची नोंद झाली आहे. त्या दृष्टीने औंढा नागनाथ पोलीस स्टेशनकडून सर्व ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. औंढा नागनाथ येथेही २४ तास सतत पहारा आहे. गणेश मंडळाच्या बंदोबस्तासाठी आणखी जास्तीचे पोलीस कुमक मागविण्यात आली असल्याचे औंढा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी सांगितले.

मागविण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक डी. वाय. एस.पी, एस आर पी एफचे १५ कर्मचारी असून सात मुख्यालय कर्मचारी आहेत. शिवाय आरसीपी प्रशिक्षणार्थी पोलीस दहा पुरुष व दहा महिला कर्मचारी पोलीस स्टेशनचे ३८ कर्मचारी तर होमगार्ड पथकाचे ४२ पुरुष व ९ महिला होमगार्ड यांच्या साह्याने बंदोबस्तात वाढ केल्याचे औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिले साहेब यांनी सांगितले. याशिवाय औंढा नागनाथ येथील सर्वच गणेश मंडळाला एकूणच तगडा बंदोबस्त असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

Back to top button