Gauri Ganpati 2023 | ज्येष्ठा गौरीचे आरोग्य सेविकाच्या रूपात आगमन | पुढारी

Gauri Ganpati 2023 | ज्येष्ठा गौरीचे आरोग्य सेविकाच्या रूपात आगमन

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याला महत्त्व देत देशातील आरोग्य विभागाने आपली जबाबदारी पार पाडली. अनेक डॉक्टर व आरोग्य सेवकांनी आहोरात्र काम करून अनेकांचे जीव वाचविले. या आठवणींना गौरी आगमनाने उजाळा देण्यात आला आहे. (Gauri Ganpati 2023)

संबंधित बातम्या : 

जवळाबाजार येथील बाहेती कुटुंबाने ज्येष्ठा गौरीचे आगमन आरोग्य सेविकाच्या रूपात करून एक वेगळेपण दाखवून दिले आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर बाहेती यांच्या पत्नी मंगल बाहेती यांनी आपल्या ज्येष्ठा गौरीचे आगमन आरोग्य सेविका व डॉक्टर रूपात  केले आहे. कोरोना काळातील डॉक्टर व आरोग्य सेविका रुपातील जेष्ठा गौरीसमोर वैद्यकीय औषधे ठेवण्यात आली आहेत.  ज्येष्ठा गौरीचे विविध रूपात घरोघरी कुटुंबातील मंडळीकडून आगमन केले जात असते. पण बाहेती कुटुंबातील मंडळीकडून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून  दैनंदिन जीवनात आरोग्याची काळाजी घेणे किती महत्वाचे आहे, हे ज्येष्ठा गौरीचा माध्यमातून सांगितले आहे. (Gauri Ganpati 2023)

संबंधित बातम्या

   हेही वाचा : 

 

Back to top button