हिंगोली : अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले; पोक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

हिंगोली : अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले; पोक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

वसमत; पुढारी वृत्तसेवा : वसमत शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात वैभव अच्युत चौरे, रा. पिंपळा चौरे याच्यासह एका महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील श्रीनगर कॉलनी येथील एका घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली. बुधवारी (दि. ५) पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलिस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांच्यासह पथकाने घरावर छापा टाकला आणि एका पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन श्रीनगर येथील संशयित आरोपी महिलेने देह विक्री करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news