हिंगोली : राहुल गांधींच्या स्वागतासाठी कळमनुरीकर सज्ज; महिला, तरुणांत यात्रेबद्दल आकर्षण

हिंगोली : राहुल गांधींच्या स्वागतासाठी कळमनुरीकर सज्ज; महिला, तरुणांत यात्रेबद्दल आकर्षण

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील हिवरा पाटी येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कळमनुरी तालुक्यातील नेतेमंडळीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाली आहेत. एवढेच नव्हे, तर राज्यातील विविध भागातून ढोल, ताशे, कवायत पथकेही दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आगमन झाले. या तालुक्यातील पहिले गाव हिवरा पाटी असून या ठिकाणी दुपारी १२ पासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आले आहेत. जीप, टेम्पो, पीकअपमधून ही मंडळी आली आहे. या मार्गावरील अनेक गावांतून आबालवृद्ध या यात्रेचा ऐतिहासिक क्षण डोळ्याने टिपण्यासाठी राहुल गांधी यांच्या हाकेला ओ देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
विशेष म्हणजे महिला व लहान मुलांना या यात्रेचे प्रचंड आकर्षण दिसत आहे. महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. स्वागतासाठी या ठिकाणी महाद्वार उभारले आहे. सगळीकडे पंजा चिन्ह असलेले तिरंगी झेडे फडकत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news