हिंगोली : तिरुपतीला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात : ३ ठार, ११ जखमी

कळमनुरी अपघात
कळमनुरी अपघात
Published on
Updated on

डोंगरकडा: पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील वानखेडे परिवार तिरुपती दर्शनासाठी गाडीने गेले होते. तिरुपती दर्शन घेऊन आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला जात असताना बेंगलोर महामार्गावर चालकाचा गाडीवरील (क्रमांक MH 27 AR 8315) ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्यावरील दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात डोंगरकडा येथील पती पत्नीसह १ जण ठार झाला. ही घटना रविवारी (दि. 31) रात्री अकरा वाजता घडली.

या अपघातात डोंगरकडा येथील शंकर लोमटे (वय 40) पत्नी रेखा शंकर लोमटे (वय 35) राजू वानखेडे (वय 40) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर अन्य ११ जणांना जखमी अवस्थेत चित्रदुर्गा जिल्ह्यातील चित्रदुर्गा शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डोंगरकडा येथील वानखेडे परिवार देवदर्शनला गेले असता त्यांच्यावर काळाने मोठा घाला घातल्यामुळे डोंगरकडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news